Posts

Aai Bhavani Tujhya Krupene Marathi Lyrics | आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला Marathi Lyrics

Image
  Aai Bhavani Tujhya Krupene Marathi Lyrics | आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला Marathi Lyrics  आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी आज गोंधळाला ये .... गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये उधं उधं उधं उधं उधं गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी आज गोंधळाला ये .... गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये उधं उधं उधं उधं उधं अग सौख्यभरीला माणिकमोती मंडप आकाशाचा हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला आज आम्हांवरी संकट भारी धावत ये लौकरी अंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये अंबाबाईचा ..... उधं उधं उधं उधं उधं बोल भवानी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं

Lakkha Padala Prakash Gondhal Marathi Lyrics | लख्ख पडला प्रकाश गोंधळ Marathi Lyrics | Jaundya Na Balasaheb Movie 2016

Image
  Lakkha Padala Prakash Gondhal Marathi Lyrics | लख्ख पडला प्रकाश गोंधळ Marathi Lyrics | Jaundya Na Balasaheb Movie 2016 लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मी पणाचा दिमाख तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा.. इज तळपली, आग उसळली ज्योत झळकली, आई गं… या दिठीची काजळ काळी रात सरली आई गं… बंध विणला, भेद शिनला भाव भिनला आई गं… भर दुखांची आस जीवाला रोज छळते आई गं… माळ कवड्यांची घातली गं.. आग डोळ्यात दाटली गं.. कुंकवाचा भरून मळवट या कपाळीला… आई राजा उधं उधं उधं.. उधं..उधं.. उधं..उधं.. तुळजापूर तुळजाभवानी आईचा उधं..उधं.. माहुरी गडी रेणुका देवीचा उधं..उधं.. आई अंबाबाईचा उधं..उधं.. देवी सप्तशृंगीचा उधं..उधं.. बा सकलकला अधिपती गणपती धाव गोंधळाला याव पंढरपूर वासिनी विठाई धाव गोंधळाला यावं गाज भजनाची येऊ दे गं झांज सुजनाची वाजु दे पत्थरातून फुटलं टाहो या प्रपाताचा Song credit - Music - Ajay - Atul Singer - Ajay Gogavale Lyricist - Ajay - Atul/ Rooh

Aaicha Jogwa magen Marathi Lyrics | आईचा जोगवा जोगवा मागेन Marathi Lyrics

Image
  Aaicha Jogwa magen Marathi Lyrics | आईचा जोगवा जोगवा मागेन Marathi Lyrics आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन अनादी निर्गुणी प्रगटली भवानी । मोह महिषासूर मर्दनालागूनी । विविध तपाची करावयाची झाडणी । भक्तालागी तू पावसी निर्वाणी ॥१॥ आईचा जोगवा जोगवा मागेन द्वैत सारूनी माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीसी जाईन ॥२॥ आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन नवविध भक्तीच्या करुन नवरात्रा । करूणा पोटी मागेन मी ज्ञानपुत्रा । धरीन सद्‍भाव अंतरीच्या मित्रा । दंभ सासर्‍या सांडीन कुपात्रा ॥३॥ आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन | पूर्ण बोधाची घेईन परडी । आशा तृष्णेच्या पाडीन दरडी । मनोविकार करीन मी कुर्वंडी । अद्‍भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥ आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन | आता साजनी झाले मी निसंग । विकल्प नवर्‍याचा सोडियला, संग । कामक्रोध हे झोडियले मांग । केला मोकळा मार्ग सुरुंग ॥५॥ आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन | ऐसा जोगवा मागुनी ठेविला । जाऊनी नवस महाद्वारी फेडिला । एकपणे जनार्दन देखियला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥ आईचा

Bandhu yeil maheri nyayla Marathi Lyrics | बंधू येईल माहेरी न्यायला Marathi Lyrics

Image
  Bandhu yeil maheri nyayla Marathi Lyrics | बंधू येईल माहेरी न्यायला Marathi Lyrics बंधू येईल माहेरी न्यायला  बंधू येईल माहेरी न्यायला  गौरी गणपतीच्या सणाला गाडी घुंघराची येईल न्यायला  गाडी घुंघराची येईल न्यायला  गौरी गणपतीच्या सणाला सन वर्षाचा हा गौरी गणपती  सन वर्षाचा गणपती  सन वर्षाचा गणपती तिथ येईल आनंदाला भरती  येई आनंदाला भरती येई आनंदाला भरती साडी चोळी नवी  साडी चोळी नवी नेसून मिरवायला गौरी गणपतीच्या सणाला,  बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला तिथ जमतील लाडक्या मैतरणी  तिथ लाडक्या मैतरणी  तिथ लाडक्या मैतरणी फेर धरतील भवती साऱ्या जनी  फेर धरतील साऱ्या जनी,  फेर धरतील साऱ्या जनी  मला विनवणी करतील नाचायला, मला विनवणी करतील नाचायला गौरी गणपतीच्या सणाला बंधू येईल माहेरी न्यायला  गौरी गणपतीच्या सणाला माहेरी जाया घुमत मन पाखरू  हे घुमत मन पाखरू  हे घुमत मन पाखरू माय बापाची ओढ कशा आवरू  हि ओढ कशा आवरू  हि ओढ कशा आवरू  गोड कौतिक करवूनी घ्यायला गोड कौतिक करवूनी घ्यायला  गौरी गणपतीच्या सणाला,  बंधू येईल माहेरी न्यायला  गौरी गणपतीच्या सणाला, गाडी घुंघराची येईल न्यायला  गौरी गणपती

aali aali ho gondhalala aai Marathi lyrics | आली आली हो गोधळा आई Marathi Lyrics

Image
Aali aali ho gondhalala aai Marathi lyrics | आली आली हो गोधळा आई Marathi Lyrics आली आली हो गोंधळाला आई तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधं ग तुळजामाई तुळजाभवानी अंबाबाई खुशीनं गोंधळाला आली रं तुळजाभवानी माझी भक्ताच्या नवसाला पावली रं तुळजाभवानी माझी मातीच्या कुडाची माझी साधी झोपडी बसायला नव्हती घरात फाटकी घोंगडी गुमानं भुईवर बसली रं तुळजाभवानी माझी खुशीनं तेलाचा दिवा मी आता लावला निवद देवीला भाजीभाकरी पावला आवडीनं गुळपाणी प्याली रं तुळजाभवानी माझी भवानी मी तुझा भक्त खरा भुत्या-जोगती नाचनाचती भक्तीची परडी सांभाळ डुगडुग ज्ञानरसाचा झरा कवडीच्या माळा घालुनी गळा मागू जोगवा जरा अगं येळेला धावुनी आली रं तुळजाभवानी माझी

Omkar Swarupa Marathi Lyrics | ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था Marathi Lyrics | Suresh Wadkar

Image
  Omkar Swarupa Marathi Lyrics | ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था Marathi Lyrics | Suresh Wadkar ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो, तुज नमो, तुज नमो, तुज नमो । नमो मायबापा, गुरुकृपाघना, तोडी या बंधना मायामोहा, मोहोजाल माझे कोण नीरशील, तुजविण दयाला सद्गुरुराया । ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो, तुज नमो, तुज नमो, तुज नमो । सद्गुरुराया माझा आनंदसागर, त्रैलोक्या आधार गुरुराव, त्रैलोक्या आधार गुरुराव, गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, ज्या पुढे उदास चंद्र रवी, रवी, शशी, अग्नि, नेणती ज्या रुपा, रवी, शशी, अग्नि, नेणती ज्या रुपा, स्वप्रकाशरुपा नेणे वेद, स्वप्रकाशरुपा नेणे वेद । एका जनार्दनी, गुरुपरब्रम्ह, एका जनार्दनी, गुरुपरब्रम्ह, तयाचे पै नाम सदा मुखी, तयाचे पै नाम सदा मुखी, तुज नमो, तुज नमो, तुज नमो । ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो, तुज नमो, तुज नमो, तुज नमो । Song Credit - Song : Omkar Swarupa Singer : Suresh Wadkar Music : Shridhar Pha

Gajanana Shri Ganraya Marathi Lyrics | गजानना, श्री गणराया Marathi Lyrics| Lata Mangeshkar

Image
  Gajanana Shri Ganraya Marathi Lyrics | गजानना, श्री गणराया Marathi Lyrics| Lata Mangeshkar  गजानना, श्री गणराया आधी वंदू तुज मोरया मंगलमुर्ती, श्री गणराया आधी वंदू तुज मोरया सिंदुरचर्चित धवळे अंग चंदन उटी खुलवी रंग बघता मानस होते दंग जीव जडला चरणी तुझिया आधी वंदू तुज मोरया गौरीतनया भालचंद्रा देवा कृपेच्या तू समुद्रा वरदविनायक करुणागारा अवघी विघ्ने नेसी विलया आधी वंदू तुज मोरया गीत – शान्‍ता शेळके संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर – लता मंगेशकर गीत प्रकार – प्रथम तुला वंदितो , भक्तीगीत

Pratham Tula Vandito Marathi Lyrics | प्रथम तुला वंदितो Marathi Lyrics | Ashtavinayak

Image
  Pratham Tula Vandito Marathi Lyrics  | प्रथम तुला वंदितो Marathi Lyrics | Ashtavinayak   प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया विघ्नविनाशक, गुणिजन पालक, दुरित तिमिर हारका सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्यासारखा वक्रतुंड ब्रम्हांडनायका, विनायका प्रभुराया सिद्धिविनायक तूच अनंता, शिवात्मजा मंगला सिंदूर वदना, विद्याधिशा, गणाधिपा वत्सला तुच ईश्वरा साह्य करावे, हा भवसिंधु तराया गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसुता चिन्तामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता रिद्धि सिद्धीच्या वरा दयाळा, देई कृपेची छाया Song Credit - गीतकार : शांताराम नांदगावकर गायक : पं. वसंतराव देशपांडे - अनुराधा पौडवाल संगीतकार : अनिल - अरुण चित्रपट : अष्टविनायक (१९७९) Lyricist : Shantaram Nandgaokar Singer : Pt. Vasantrao Deshpande - Anuradha Paudwal Music Director : Anil - Arun Movie : Ashtavinayak (1979)

Tuz Magato Mee Aata Marathi Lyrics | तुज मागतो मी आता Marathi Lyrics | Ganesh Bhajan - Marathi Song | Lata Mangeshkar

Image
  Tuz Magato Mee Aata Marathi Lyrics | तुज मागतो मी आता Marathi Lyrics | Ganesh Bhajan - Marathi Song | Lata Mangeshkar तुज मागतो मी आता मज ध्यावे एकदंता तुझे ठायी माझी भक्ति विरुठावी गणपती तुझे ठायी ज्याची प्रीती त्याची घडावी संगती धरणीधरा ऐसे द्यावे सर्वांभूती लीन व्हावे तुज शरण शरण शरण आलो पतित मी जाण तुझा अपराधी मी खरा आहे इक्षुचापधरा माझी येऊ दे करुणा तुजलागी गजानना Song Credit -  Song: Tuz Magato Mee Aata Album: Siddhivinayak singer: lata mangeshkar