टाळ बोले चिपळीला Lyrics | Taal Bole Chipalila Lyrics
टाळ बोले चिपळीला Lyrics | Taal Bole Chipalila Lyrics
टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ॥धृ॥
दरबारी आले रंक आणि राव सारे एकरूप नाही भेदभाव
गाऊ नाचू सारे होऊनी नि:संग ॥१॥
जनसेवेपायी काया झिजवावी घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देऊनी हा बोलतो मृदंग ॥२॥
ब्रम्हानंदी देह बुडूनिया जाई एक एक खांब वारकरी होई
ब्रम्हानंदी देह बुडूनिया जाई एक एक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग ॥३॥
👌👌
ReplyDelete