Ranga Maliyela Marathi Lyrics | रंग माळीयेला Marathi Lyrucs | Anandi Gopal movie 2019
Ranga Maliyela Marathi Lyrics | रंग माळीयेला Marathi Lyrucs | Anandi Gopal movie 2019
रंग माळीयेला, श्रीरंग माळीयेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
गाठी बांधीयेला, सावळ्याचा शेला
गाठी बांधीयेला, सावळ्याचा शेला
सौभाग्याची मंगलघटिका
सौभाग्याची मंगलघटिका,आली आली ग
हळदी ल्याली, बाहुली माझी मोठी झाली ग
साजणाची स्वारी, थांबली ग दारी
सात जन्मासाठी बांधली ग दोरी
सात जन्मासाठी बांधली ग दोरी
आज मनमनी तनमणी हरखला ग
रंग माळीयेला, श्रीरंग माळीयेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
गाठी बांधीयेला, सावळ्याचा शेला
गाठी बांधीयेला, सावळ्याचा शेला
रंग माळीयेला, श्रीरंग माळीयेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे
आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे
कोवळी माती, सोवळे नाते
कोवळी माती, सोवळे नाते
संसारचे फिरते जाते
क्षणी विहरते, क्षणात अडते
अदमासाने पाऊल पडते
रीतभात हे सांगते
आ... रीतभात हे सांगते
प्रीत दूरच्या अंगणी नांदते ग
हात धरियेला, हात धरिलीयेला
भरतार केला सरस्वती चा चेला
माथी घाली ग पुस्तक पाठी
माथी घाली ग पुस्तक पाठी
चांदण गोंदण आली भाळी
अल्लड भोळी नवीन भाळी
दिस मासाची वर्षे झाली
केशर न्हाली मेहंदी ओली
दिस मासाची वर्षे झाली
केशर न्हाली मेहंदी ओली
अंग अंग हे बहरले
हो... अंग अंग हे बहरले
आज दर्पणी ही कुणी वेगळी ग
रंग मालियेला, श्रीरंग मालियेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
रंग मालियेला, श्रीरंग मालियेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे
Song Credit -
Song: Ranga Maliyela
Singer: Ketaki Mategaonkar & Sharayu Date
Music: HRISHIKESH - SAURABH - JASRAJ
Lyricist: Vaibhav Joshi
Actors: Lalit Prabhakar
Production House: Zee Studios, Namah Pictures & Fresh Lime Films
Producer: Zee Studios, Kishor Arora, Shareen Mantri Kedia ,Arunava Joy Sengupta & Akash Chawla
Director: Sameer Vidwans
Arrangers /Programmers: HRISHIKESH - SAURABH - JASRAJ"
Mixed by: Vijay Dayal (YRF Studios)
Mastered by: Dipesh Sharma Batalvi.
Comments
Post a Comment